Home Breaking News • आलापल्लीत बंगाली नववर्षानिमित्त ‘कृष्णपूजा’ उत्साहात • राजे अम्ब्रीशराव महाराजांची उपस्थिती

• आलापल्लीत बंगाली नववर्षानिमित्त ‘कृष्णपूजा’ उत्साहात • राजे अम्ब्रीशराव महाराजांची उपस्थिती

53

• आलापल्लीत बंगाली नववर्षानिमित्त ‘कृष्णपूजा’ उत्साहात

• राजे अम्ब्रीशराव महाराजांची उपस्थित

सुवर्ण भारत :शंकर महाकाली


आलापल्ली : बंगाली नववर्षाच्या निमित्ताने आलापल्ली येथे आयोजित करण्यात आलेली श्रीकृष्ण पूजा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडली. या कार्यक्रमात परिसरातील बंगाली बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा उत्सव साजरा केला.

या सोहळ्याला अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांनी उपस्थितांना बंगाली नववर्षाच्या शुभेच्छा देत सर्वांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण केले. यावेळी त्यांनी बंगाली बांधवांसोबत पारंपरिक नृत्यात सहभागी होत उत्सवाची रंगत अधिकच वाढवली.

कार्यक्रमादरम्यान श्रीकृष्ण पूजन, भजन-कीर्तन तसेच विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पारंपरिक सादरीकरणांमुळे संपूर्ण परिसर भक्तीमय आणि उत्सवी वातावरणाने भारावून गेला होता.

या उत्सवाच्या निमित्ताने सामाजिक ऐक्य आणि सांस्कृतिक जतनाचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमास युवा नेते कुमार अवधेशराव बाबा आत्राम, जिल्हा सचिव अभिजित शेंडे, तालुका अध्यक्ष विकास तोडसाम, पेसा अध्यक्ष दीपक तोगरवार, सागर कोहळे, राजस्मित पोचमपल्ली तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.