Home Breaking News नवनिर्मित भव्य समाज भवनाचे लोकार्पण माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांच्या शुभहस्ते संपन्न.

नवनिर्मित भव्य समाज भवनाचे लोकार्पण माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांच्या शुभहस्ते संपन्न.

162

नवनिर्मित भव्य समाज भवनाचे लोकार्पण माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांच्या शुभहस्ते संपन्न.

सुवर्ण भारत : शंकर महाकाली

उपरवाही : दिनांक : १९ एप्रिल २०२६
अक्षय तृतीयेच्या पवित्र आणि मंगलमय पर्वावर उपरवाही गावात विकासाचा नवा अध्याय सुरू झाला. अंबुजा सिमेंट (अदाणी समूह कंपनी) यांच्या द्वारे उभारण्यात आलेल्या नवनिर्मित भव्य समाज भवनाचे लोकार्पण मराठा सिमेंट वर्क्स कामगार संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.

कामगार युनियन व गावकऱ्यांच्या आग्रहानुसार दीर्घकाळापासून उपरवाही परिसरातील नागरिकांना सामाजिक, सांस्कृतिक व सार्वजनिक कार्यक्रमांसाठी सुसज्ज सभागृहाची गरज भासत होती. ही गरज ओळखून नरेशबाबू पुगलिया यांनी दिलेला शब्द प्रत्यक्षात उतरवत अंबुजा सिमेंट कंपनीकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या ठाम प्रयत्नांमुळेच आज हे समाज भवन साकार झाले असून गावाच्या विकासासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

या लोकार्पण सोहळ्यात अंबुजा सिमेंटचे युनिट हेड महेंद्रसिंग राठोड यांनी महत्त्वपूर्ण पुढाकार घेत समाज भवनाचे काम पूर्णत्वास नेले. त्यांच्या या मोलाच्या योगदानाबद्दल कामगार युनियनतर्फे त्यांचा विशेष सत्कार करून आभार मानण्यात आले.

मार्गदर्शन करताना नरेशबाबू पुगलिया यांनी सांगितले की, हे समाज भवन उपरवाहीच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनाला नवी दिशा देईल. विविध कार्यक्रम, बैठका तसेच शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांसाठी हे अत्यंत उपयुक्त ठरेल. तसेच गावांच्या विकासासाठी उद्योग, कामगार आणि गावकरी यांच्यातील समन्वय महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले. अंबुजा सिमेंट सारख्या उद्योगांनी सामाजिक बांधिलकी जपत केलेले कार्य कौतुकास्पद आहे. जिल्ह्यातील एकमेव अंबुजा सिमेंट कंपनीने स्वःताच्या उभारलेल्या ४०० विद्यार्थ्यांच्या क्षमतेच्या आयटीआयमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठा लाभ होत आहे, असेही त्यांनी सांगितले. भविष्यातही अशा विकासकामांसाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमादरम्यान नागरिक व महिलांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. ग्रामपंचायत उपरवाहीच्या सरपंच गिता सिडाम व उ पसरपंच अनिल कौरासे यांनी नरेशबाबू पुगलिया यांचे विशेष आभार मानत त्यांच्या विकासाभिमुख कार्याचे कौतुक केले.
यावेळी मंचावर अंबुजा सिमेंटचे एच आर हेड संतोष कुलकर्णी, अंबुजा सिमेंट फाउंडेशनचे झोन मॅनेजर श्रीकांत कुंभारे, मराठा सिमेंट वर्क्स कामगार संघटनाचे महासचिव अजय मानवटकर, उपाध्यक्ष सागर बल्की, कामगार युनियनचे शिवचंद काळे, देवेंद्र गहलोत, विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचे ग्रामिण अध्यक्ष अँड. अविनाश ठावरी, जिल्हा महासचिव अशोक नागापूरे, चंद्रपूर शहराध्यक्ष देवेंद्र बेले, पंकज गुप्ता, जिल्हा परिषद माजी सदस्य अविनाश जाधव, कामगार युनियनचे रामदास वाम्दरकर, विरेंद्र आर्या, क्रिष्णंन नायर, दालमिया सिमेंट कंपनीचे उत्तम उपरे, सतीश बल्की, बोड गुरूजी इकबाल शेख, धर्मराज पारधे, अनिल वासेकर, रविंद्र रेडी, शंकर पेगडपल्लीवार, बाळू खनके, शंकर धांडे, मंगेश जिवतोडे तसेच स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, कामगार व कंपनीचे ऑफिसर वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रभावी प्रास्ताविक अंबुजा सिमेंटचे झोन मॅनेजर श्रीकांत कुंभारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपसरपंच अनिल कौरासे यांनी मानले.

या कार्यक्रमानिमित्त सर्व गावकऱ्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला.