रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था अन् धुळीच्या प्रदूषणाने नागरिक त्रस्त
जटपूरा प्रभाग सात मधील नागरिकांचे चंद्रपूर मनपा आयुक्तांना निवेदन
चंद्रपूर -किरण घाटे : विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर समता विकास मंडळ, जटपूरा प्रभाग क्र.7- जटपूरा वार्ड नं. 2, येथील नगारीकांनी या परिसरातील रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था आणि धुळीच्या प्रदूषणाबाबतचे निवेदन मनपा आयुक्तांना नुकतेच दिले आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून अमृत जल याेजना व सिवेज ट्रिटमेंट पाईप लाॅईन याेजने मुळे पंचशिल चाैक ते जटपूरा गेट पर्यंत खड्डे खाेदलेले आहे.
हा रस्ता पूर्णपणे उखडला असून त्यावर माेठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. नविन रोड बनवण्याच्या नावाखाली राेडच्या दाेन्ही बाजुनी एक ते दिड फूट खड्डे करण्यात आलेले आहे. हा रस्ता शहराच्या मध्यभागी असुन जेव्हा महात्मा गांधी रस्ता व कस्तुरबा गांधी रस्ता हे माेर्चा, मिरवणूक, रॅलीसाठी बंद असताे तेव्हा शहरात ये-जा करण्यासाठी हाच रस्ता उपयाेगात आणला जाताे. खड्ड्यांमुळे दुचाकी वाहनांचे आणि पादचा-यांचे अपघात हाेण्याचे प्रमाण अधिक मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
रस्ता खराब झाल्यामुळे वाहने ये-जा करताना हवेत माेठ्या प्रमाणावर धूळ उडत असते. या धुळीच्या प्रदूषणामुळे लहान मुले आणि वृद्धांना श्वसनाचे त्रास हाेत आहेत. तद्वतच श्वसनाच्या आजाराने बेजार झाले आहेत. घरांमध्ये सतत धूळ जात असल्याने परिसरात अस्वच्छता पसरत आहे आणि नागरिकांचे आराेग्य धाेक्यात आले आहे. खड्डे असल्यामुळे पाऊस आल्यास हा संपूर्ण परिसर चिखलमय हाेण्याची व त्या खड्यात पाणी जमा हाेण्याची शक्यता आहे. ज्यामुळे माेठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. एप्रील व मे महिण्यात हवामान खात्याने या आधीच मुसळधार व वेगवान वा-या वादळासह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
मनपा प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने बघण्याची गरज असतांना दुर्लक्ष करतांना दिसत आहे.
सदरहू प्रकरणाची तातडीने दखल घेऊन धुळीचे प्रदूषण राेखण्यासाठी आवश्यक त्या उपाययाेजना कराव्यात आणि रस्त्याची दुरुस्ती करावी या बाबतचे निवेदन वार्डातील शेकडो नागरिकांनी आयुक्तांना दिले आहे.
निवेदन सादर करताना नितीन रामटेके ,पराग चुनारकर, परिमल रामटेके, नितीन रायपूरे, महेश काहिलकर, जयंत रामटेके, अमर रामटेके, सुशिल बारसिंगे, संताेष ढाेले, संताेष पुणेकर, रमा ढाेले, माया अलाेने, बेला रामटेके, संगिता अलाेने, अस्मिता रामटेके, सुजाता रामटेके, रिता बारसिंगे, प्रणाली रामटेके, पुजा तावाडे आदिं उपस्थित होते.



